महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पाकिस्तानने डिवचलं, तर भारताकडून लष्करी कारवाई होणार; अमेरिकन गुप्तचर अहवालात दावा

पाकिस्तान अतिरेकी कारवाया करत राहिला आणि भारताला डिवचत राहिला, तर भारताकडून पाकिस्तानवर सैन्य कारवाई केली जाऊ शकते, असे अमेरिकेच्या गुप्तचरांच्या अहवालात म्हटलं आहे.

PM Modi-Pak
मोदी-इम्रान

By

Published : Apr 14, 2021, 4:24 PM IST

नवी दिल्ली -भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या युद्धांत पाकिस्तानला पराभव पत्कारावा लागला आहे. पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन अतिरेकी तसंच घातपाती कारवाया करतच असतो. भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिलं जातं. जर याप्रकारे पाकिस्तान अतिरेकी कारवाया करत राहिला आणि भारताला डिवचत राहिला, तर भारताकडून पाकिस्तानवर सैन्य कारवाई केली जाऊ शकते, असे अमेरिकेच्या गुप्तचरांच्या अहवालात म्हटलं आहे.

पाकिस्तानने भारताल उकसवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या नेतृत्वात भारतीय लष्कर पाकिस्तावर सैन्य कारवाई करू शकते. भारताच्या मागील सरकारांप्रमाणे मोदींचे सरकार शांत बसणार नाही. तर मोदी सरकार पाकिस्तावर कारवाई करेल. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामान्य युद्ध होण्याची शक्यता नसली तरी या दोघांमधील संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, असेही अहवालात म्हटलं आहे.

अणु-समृद्ध देशांमधील तणाव चिंताजनक -

भारताने आपले धोरण बदलले आहे. भारत आता सहन करण्याच्या मार्गापासून दूर गेला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकार पाकिस्तानवर सैन्य कारवाई करण्यास मागे हटणार नाही. दोन अणु-समृद्ध देशांमधील तणावाची ही स्थिती जगासाठी चिंताजनक आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने यापूर्वी दोनदा पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली आहे, असे अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात म्हटलं आहे.

दोनदा पाकिस्तानवर लष्करी कारवाई -

भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मिरच्या पुलवामा येथे भारतीय सैन्याला लक्ष्य केले होते. ज्यात बरेच भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला केला. ज्यामध्ये सुमारे 300 दहशतवादी ठार झाले. तसेच 2016 च्या भारतातील उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरही भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या भूमीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. आशा स्थितीत पाकिस्तानने पुन्हा भारताला डिवचले तर मोदींच्या नेतृत्वातील सरकार पाकिस्तानवर सैन्य कारवाई करू शकते, असे अमेरिकन गुप्तचर अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा -देशातील विद्यापीठांच्या शिखर संघटनेची बैठक; पंतप्रधान मोदींनी केले संबोधित

ABOUT THE AUTHOR

...view details