महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल्पकालीन सदस्यत्वासाठी भारताला ५५ देशांचे समर्थन

भारताला अल्पकालीन सदस्यत्वासाठी समर्थन देणाऱ्या देशांमध्ये चीन आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. राष्ट्रीय परिषदेच्या २०२१-२२ च्या सत्रासाठी ५ अस्थाई सदस्यांची निवड पुढील वर्षी होईल. हे सदस्यत्व २ वर्षांसाठी असणार आहे.

सैयद अकबरुद्दीन

By

Published : Jun 26, 2019, 9:07 PM IST

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) मध्ये भारताला मोठा कूटनैतिक विजय मिळाला आहे. यूएनएससीमधील भारताच्या अस्थाई सदस्यत्वासाठी आशिया प्रशांत समुहातील ५५ देशांनी सर्वसंमतीने समर्थन दिले आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी सैयद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली. हे सदस्यत्व २ वर्षांसाठी असणार आहे.

भारताला अल्पकालीन सदस्यत्वासाठी समर्थन देणाऱ्या देशांमध्ये चीन आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूटान, इंडोनेशिया, इराण, जपान, कुवेत, किर्गिस्तान, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, कतार, सौदी अरब, श्रीलंका, सीरिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि व्हिएतनाम या देशांनीही भारताला समर्थन दिले आहे. राष्ट्रीय परिषदेच्या २०२१-२२ च्या सत्रासाठी ५ अस्थाई सदस्यांची निवड पुढील वर्षी होईल. भारतीय उमेदवारीचे समर्थन करणाऱ्या देशांचे भारताच्या वतीने आभार मानण्यात येत असल्याचे ट्विट अकबरुद्दीन यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details