वॉशिंग्टन : पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी भारताला दरवर्षी किमान 100 अब्ज डॉलर्सच्या परदेशी थेट गुंतवणुकीची गरज असल्याचे भारत-अमेरिका धोरणात्मक सहकार्य मंचाचे प्रमुख मुकेश अघी यांनी म्हटले आहे.
परकीय गुंतवणुकीत मोठा हिस्सा अमेरिकेचा असेल
भारताची अर्थव्यवस्था सध्या 2.7 ट्रिलियन डॉलर एवढी आहे. 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात थेट परकीय गुंतवणुकीची(एफडीआय) गरज भासणार आहे. भारताला दरवर्षी किमान 100 अब्ज डॉलर्सच्या परकीय गुंतवणुकीची गरज असून यातील मोठा भाग हा अमेरिकेचाच असेल असा मला विश्वास आहे असे अघी म्हणाले.