वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगावर भारताची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, याठिकाणी निवड होण्याच्या स्पर्धेत चीनही होता, त्याला मागे टाकून आपली याठिकाणी निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचा (इकोसॉक) एक भाग म्हणजे महिला आयोग (सीएसडब्ल्यू). देशाचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.
"प्रतिष्ठित अशा इकोसॉकमध्ये भारताची निवड झाली आहे. कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन (सीएसडब्ल्यू) चा भारत आता एक सदस्य झाला आहे. देशामध्ये स्त्री-पुरुष समानता आणि महिला सबलीकरणाबाबत सुरू असलेल्या कामांची ही पोचपावती आहे. देशाला दिलेल्या पाठिंब्यासाठी इतर सदस्यांचे आभार." अशा आशयाचे ट्विट त्रिमूर्तींनी केले.