वॉशिंग्टन - अमेरिकेत कोविड - 19 च्या संसर्गामुळे गेल्या 24 तासांत 3 हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. एप्रिलनंतरचे एका दिवसातील हे सर्वाधिक मृत्यू आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती दिली आहे.
बुधवारी अमेरिकेत एकूण 3 हजार 71 रुग्ण मृत्युमुखी पडले. यासह देशातील मृतांचा आकडा 2 लाख 89 हजार 283 पर्यंत वाढला आहे, अशी माहिती सिन्हुआने दिली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंगने (सीएसएसई) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ही माहिती दिली आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बायडेन यांचा शपथविधी साधेपणानं