वॉशिंग्टन : दान केलेले मानवी अवयव घेऊन जाणारे एक हेलिकॉप्टर लॉस एंजेलिसच्या एका इमारतीवर कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. यावेळी सुदैवाने हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या तीनही लोकांचा जीव वाचला आहे. या तिघांनाही किरकोळ दुखापत झाली.
सुदैवाने आग लागली नाही..
खासगी एअर अॅम्ब्युलन्स असलेले हे हेलिकॉप्टर सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या (यूएससी) केक हॉस्पिटलच्या छतावर कोसळले. सुदैवाने या अपघातानंतर आग लागली नाही, तसेच हेलिकॉप्टरमधून इंधन गळतीही झाली नसल्याचे लॉस एंजेलिस अग्निशामक विभागाने स्पष्ट केले. या अपघातानंतर हेलिकॉप्टरच्या चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.