भारतीय वंशाच्या कमला हॅरीस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष होणार आहेत. याशिवाय या पदासाठी निवड झालेल्या त्या पहिल्या आशियाई वंशाच्या व्यक्ती ठरल्या आहेत. तर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्तीही त्या ठरणार आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विविध नियुक्त्यांविषयी हॅरीस यांनी ठामपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
19 व्या वर्षीच अमेरिकेत आल्या होत्या हॅरीस यांच्या आई
हॅरीस यांच्या आई श्यामला गोपालन भारतीय तर वडील डोनाल्ड हॅरीस जमैकाचे आहेत. हॅरीस यांच्या आई वयाच्या 19 व्या वर्षी अमेरिकेच्या बर्कली येथे आल्या. येथेच त्यांची भेट डोनाल्ड हॅरीस यांच्याशी झाली. त्यानंतर दोघांनी विवाह केला. यातून त्यांना कमला आणि माया या दोन मुली झाल्या.
कमला हॅरीस यांची कारकीर्द
- 20 ऑक्टोबर 1964 रोजी कॅलिफोर्नियाच्या ऑकलंडमध्ये जन्म
- हॅरीस यांचे वडील जमैकन तर आई भारतीय वंशाच्या
- हॅरीस यांचे आजोबा पी व्ही गोपालन हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते
- हॉवर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण,
- अलामेडा कौंटीच्या डिस्ट्रीक्ट अॅटर्नी कार्यालयातून कारकीर्दीला सुरूवात
- नंतर सॅन फ्रॅन्सिस्कोच्या डिस्ट्रीक्ट अॅटर्नी आणि सिटी अॅटर्नी कार्यालयात नियुक्ती
- 2003 मध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोच्या डिस्ट्रीक्ट अॅटर्नी म्हणून निवडून आल्या
- 2010 आणि 2014 मध्ये अॅटर्नी जनरल म्हणून निवडून आल्या
- 2017 ते 2021 या कालावधीत कॅलिफोर्नियातून ज्युनिअर सीनेट म्हणून काम पाहिले
- 2016 च्या सीनेट निवडणुकीत लॉरेटा सॅन्शेज यांचा पराभव केला
- निवडणूक विजयानंतर अमेरिकन सीनेटवर निवडून जाणाऱ्या पहिल्या दक्षिण आशियाई अमेरिकन व्यक्ती ठरल्या
- 2020 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमॉक्रॅटीक पक्षाकडून प्रायमरी निवडणूकही त्यांनी लढविली मात्र प्रायमरीतच त्या बाद झाल्या
- राष्ट्राध्यक्षपद उमेदवारासाठी निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिलाही त्या ठरल्या आहेत
हेही वाचा -खास मुलाखत...दुभंगलेल्या अमेरिकेला बायडेन कसे सावरणार ?