सॅन फ्रॅन्सिस्को - गुगलने सुरक्षेच्या कारणास्थव प्ले स्टोअरवरून ८५ अॅप्स हटवली आहेत. ट्रेंड मायक्रोमधील सुरक्षा संशोधकांना या अॅप्समध्ये हानीकारक अॅडवेअर सापडला आहे. यानंतर गुगलने हे पाऊल उचलले आहे.
गुगलने 'प्ले स्टोअर'वरून हटवली 85 अॅप्स - international news in marathi
गुगलने सुरक्षेच्या कारणावरून 'प्ले स्टोअर'वरून ८५ अॅप्स हटविले आहेत. ट्रेंड मायक्रोमधील सुरक्षा संशोधकांना या अॅप्समध्ये हानीकारक अॅडवेअर सापडला आहे. यानंतर गुगलने हे पाऊल उचलले आहे.
ट्रेंड मायक्रोमधील मोबाइल थ्रेट रिस्पॉन्स इंजिनियर इकोलोर जू यांनी शुक्रवारी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, आम्हाला गुगल प्ले स्टोअरवर अॅडवेअरच्या रियल लाइफ परिणामाचे आणखी एक उदाहरण आढळले आहे. ट्रेंड मायक्रो त्याला अँड्रॉइड ओएस हाइडेंडा एचआरएक्सएच म्हणून ओळखतो.
हा जाहिराती प्रदर्शित करतो आणि याला थांबविणे अवघड आहे. असेही त्यांनी सांगितले. हा वापरकर्त्यांची वर्तणूक आणि वेळ ट्रिगरद्वारे ओळखी शोधण्यासाठी अद्वितीय तंत्र वापरतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे प्रभावित करणाऱ्या बर्याच अॅप्समध्ये फोटोग्राफी आणि गेमिंग अॅप्सचा समावेश असतो. ज्यांना आठ लाखांहून अधिक जणांनी डाउनलोड केले गेले आहे. त्या 85 अॅप्समध्ये सुपर सेल्फी, कॉस कॅमेरा, पॉप कॅमेरा आणि वन स्ट्रोक लाइन पजल हे अॅप्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत. जे ट्रेंड माइक्रोने केलेल्या पडताळणीत एडवेयरने संक्रमित असल्याचे समोर आले आहेत.