वॉशिंगटन - कोरोना विषाणूवरील औषध 'रेमडिसीव्हीर'ची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी घेण्यात आली असून तिचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे. भारतीय आणि अमेरिकन चिकित्सकांच्या नेतृत्वाखाली ही चाचणी घेण्यात आली, असे अमेरिकन फार्मा कंपनीने बुधवारी सांगितले.
प्राथमिक तपासणीमध्ये असे दिसून आले की, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्य ५० टक्के रुग्णांना ५ दिवस रेमडिसीव्हीरचा डोज दिल्यास रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तसेच अर्ध्याहून अधिक रुग्णांना गेल्या दोन दिवसांत घरी सोडण्यात आले आहे, असेही फार्मा कंपनीने सांगितले. तसेच ही तिसऱ्या टप्प्यातील चाचणी औषधांच्या परवानगीसाठीची शेवटची चाचणी असते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप रेमडिसीव्हीर या औषधाला जागतिक स्तरावर कुठेही परवाना मिळाला नाही. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले नाही.