वाश्गिंटन डी.सी. - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जगभरामध्ये 7 कोटी 90 लाख 86 हजार 170 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 17 लाख 38 हजार 168 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर 5 कोटी 56 लाख 74 हजार 767 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
जगभरात कोरोनाचा प्रसार पाहता, सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 89 लाख 17 हजार 152 रुग्ण आढळले आहेत. तर 3 लाख 34 हजार 218 जणांचा मृत्यू झाला आहे. अमिरेकनंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारताता 1 कोटी 1 लाख 23 हजार 778 कोरोना रुग्ण तर 1 लाख 46 हजार 778 जणांचा बळी गेला आहे. भारतानंतर फ्रान्स, ब्राझिल, रशिया आणि ब्रिटनचा क्रमांक येतो.