वॉशिंग्टन डी.सी - कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होत चालला आहे. गेल्या 24 तासांत जगभरामध्ये 6 लाख 675 हजार 625 रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांचा आकडा 5 कोटी 72 लाख 39 हजार 964वर पोहचला आहे. तर, नव्याने 10 हजार 882 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 13 लाख 65 हजार 695 झाली आहे. याचबरोबर आतापर्यंत 3 कोटी 97 लाख 34 हजार 942 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सर्वाधिक कोरोना विषाणूबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. तसेच, तेथील मृत्यूचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. आतापर्यंत1 कोटी 20 लाख 70 हजार 712 कोरोना रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. तर 2 लाख 58 हजार 333 जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रथमच घरच्या घरी कोरोना विषाणूची चाचणी करणाऱ्या किटला मान्यता दिली आहे. यामुळे अमेरिकन लोकांना वैद्यकीय सुविधा आणि तत्काळ देखभाल केंद्रांशिवायही इतर ठिकाणी चाचणी घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
भारत दुसऱ्या क्रमांकावर -