महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जगभरामध्ये 3 कोटी 33 लाख कोटी कोरोनाबाधित; तर 10 लाख बळी - जगभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

गेल्या 24 तासांमध्ये जगात तब्बल 3 हजार 705 जणांचा मृत्यू झाला असून 2 लाख 52 हजार 203 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Sep 28, 2020, 2:53 PM IST

वाशिंग्टन डी.सी - जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. गेल्या 24 तासांमध्ये जगात तब्बल 3 हजार 705 जणांचा मृत्यू झाला असून 2 लाख 52 हजार 203 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेनंतर भारतामध्ये कोरोनाचे सर्वांत जास्त रुग्ण आढळले.

जगभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

जगभरामध्ये 3 कोटी 33 लाख 10 हजार 953 कोरोनाबाधित आढळले असून 10 लाख 2 हजार 452 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 कोटी 46 लाख 39 हजार 64 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

अमेरिकेमध्ये 73 लाख 21 हजार 343 कोरोना रुग्ण आढळले, तर 2 लाख 9 हजार 453 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर भारतात 60 लाख 74 हजार कोरोना रुग्ण आढळले असून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापाठोपाठ ब्राझिल, रशिया आणि कोलबिंयामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details