हैदराबाद- जगभरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला असून गेल्या 24 तासांत जागतिक स्तरावर तब्बल 1 लाख 94 हजार 957 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 9 हजार 288 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझिलमध्ये सर्वांत जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
जगातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सुमारे पावणेतीन कोटींपर्यंत पोहोचली आहे. जगभरात 2 कोटी 74 लाख 85 हजार 488 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आत्तापर्यंत कोरोनामुळे संपूर्ण जगात 8 लाख 96 हजार 842 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 1 कोटी 95 लाख 73 हजार 99 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.