हैदराबाद : जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ही १ कोटी ९८ लाख सात हजार ६०५हून अधिक झाली आहे. तर आतापर्यंत सात लाख २९ हजार ६१३ लोकांचा यामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या एक कोटी २७ लाख २४ हजार २९९ वर पोहोचली आहे.
अमेरिकेत आतापर्यंत ५१ लाख ४९ हजार ७२३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी १ लाख ६५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ग्लोबल कोविड-१९ ट्रॅकर : जगभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी.. तर, ब्राझीलमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांमध्ये एक लाख बळींचा टप्पा ओलांडला गेला आहे. मे महिन्यानंतर देशात दररोज सुमारे एक हजार लोकांचा बळी जात आहे. गेल्या २४ तासांमध्ये झालेल्या ९०५ मृत्यूंनंतर देशातील बळींच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला.
यासोबतच इतर देशांमधील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :