वॉशिंग्टन डी. सी - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून परिस्थिती गंभीर झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 59 लाख 30 हजार 671 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 लाख 41 हजार 868 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 97 लाख 15 हजार 983 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
जगभरात 1 कोटी 59 लाख 30 हजार 671 जणांना संसर्ग - जागतिक कोरोना रुग्ण आकेडवारी
जगभरात 1 कोटी 59 लाख 30 हजार 671 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 लाख 41 हजार 868 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 97 लाख 15 हजार 983 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
अमेरिका, ब्राझील आणि भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून तिथे 42 लाखापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ब्राझीलमध्ये 23 लाखांचा आकडा कोरोनाग्रस्तांनी पार केला आहे. यापाठोपाठ भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांची झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्येही झपाट्यानं वाढ होत आहे. 13 लाख 36 हजार 861 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 31 हजार 358 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच भारतापाठोपाठ रशिया, दक्षिण अफ्रिका आणि पेरूमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, जगभरातली देश कोरोनावर लस शोधण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. कोरोनासाठी जगभरात सध्या 145 हून अधिक लसींची निर्मिती करण्यात येत आहे. यांपैकी केवळ 20 लसींना मानवी चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. तर भारतामध्ये स्वदेशी विकसित लस 'कोव्हॅक्सिन'ची मानवी क्लिनिकल चाचणी घेण्यास सुरवात झाली आहे.