वॉशिंग्टन डी. सी - चीनमधील वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 2 लाख 18 हजार 800 कोरोना रुग्ण आढळले असून 4 हजार 388 जणांचा मृत्यू झाला आहे.
अद्यायावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 46 लाख 33 हजार 37 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 लाख 8 हजार 539 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 87 लाख 30 हजार 163 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.