वॉशिंग्टन डी. सी -कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत 5 लाख 18 हजार 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर तब्बल 1 कोटी 7 लाख 93 हजार 359 जण कोरोनाबाधित आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे, 59 लाख 30 हजार 131 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
अमेरिकेत जवळपास 27 लाख 78 हजार 467 जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 30 हजार 789 जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये 14 लाख 53 हजार 369 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 60 हजार 713 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. यापाठोपाठ रशिया, भारत आणि यूके, स्पेनला कोरोनाचा फटका बसला आहे.