वॉशिंग्टन डी. सी - कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत 5 लाख 13 हजार 186 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर तब्बल 1 कोटी 5 लाख 77 हजार 756 जण कोरोनाबाधित आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे, 57 लाख 90 हजार 762 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जगभरात 1 कोटी 5 लाख 77 हजार 756 कोरोनाग्रस्त ; तर 5 लाखपेक्षा अधिक बळी
कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत जवळपास 27 लाख 27 हजार 853 जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 30 हजार 122 जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये 14 लाख 8 हजार 485 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 59 हजार 656 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. यापाठोपाठ रशिया, भारत आणि यूके, स्पेनला कोरोनाचा फटका बसला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूची सुरुवात मध्य चीनमधील वुहान प्रांतातून झाली होती. त्यानंतर हा विषाणू झपाट्यानं जगभरात पसरला. चीनमध्ये हा विषाणू मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला.