महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Global Covid 19 Tracker: जगभरात 3 लाख 43 हजार दगावले - number of global coronavirus cases

ताज्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात कोरोनाचे 3 लाख 43 हजार 975 रुग्ण दगावले आहेत. सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेमध्ये झाले आहेत.

number of global coronavirus cases
number of global coronavirus cases

By

Published : May 24, 2020, 3:36 PM IST

वॉशिंग्टन -सर्वच देशांपुढेकोरोना विषाणूचे संकट गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 3 लाख 43 हजार 975 कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेमध्ये झाले आहेत.

तब्बल 180पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 54 लाख 3 हजार 979 कोरोनाबाधित आढळले असून 3 लाख 43 हजार 975 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 22 लाख 47 हजार 230 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

अमेरिकेतील रुग्णांची संख्या 16 लाख 66 हजार 828 कोरोनाबाधित असून 98 हजार 683 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ब्राझील आणि रशियामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 3 लाखांच्या वर झाली आहे. तर स्पेन, इटली आणि इंग्लमध्येही 2 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तर चीनमध्ये पुन्हा कोरोनाबाधित आढळत असून चीन सरकारने वुहानधील सर्व नागरिकांची करोना चाचणी करण्याची योजना आखल्याची माहिती आहे.

अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details