महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Global COVID-19 tracker: जगभरात 2 लाख 65 हजार 84 दगावले..

तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 38 लाख 22 हजार 951 कोरोनाबाधित आढळले असून 2 लाख 65 हजार 84 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 13 लाख 2 हजार 995 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

Global COVID-19 tracker
Global COVID-19 tracker

By

Published : May 7, 2020, 1:01 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 2 लाख 65 हजार 84 कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेमध्ये झाले आहेत.

तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 38 लाख 22 हजार 951 कोरोनाबाधित आढळले असून 2 लाख 65 हजार 84 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 13 लाख 2 हजार 995 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

सर्वात जास्त कोरोनाच प्रसार झालेल्या देशांमधील परिस्थिती

अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.

दरम्यान कोरोना विषाणूवर औषध शोधण्याचा जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. आता इटालियन संशोधकांनी दावा केला आहे की, त्यांनी कोरोनावर एक यशस्वीरित्या लस विकसित केली आहे. कोरोनाबाधित रुग्णावर त्याची चाचणी घेण्याची शक्यता आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. संशोधकांनी या लसीचा उंदरावर यशस्वीरित्या प्रयोग करून पाहिला आहे. उंदराच्या पेशीमध्ये या लसीमुळे कोरोनाशी लढा देणारी प्रतिजैविके तयार झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details