वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 2 लाख 44 हजार 778 कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत.
तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 34 लाख 84 हजार 176 कोरोनाबाधित आढळले असून 2 लाख 44 हजार 778 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 11 लाख 21 हजार 524 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.
जगभरामध्ये 2 लाख 44 हजार 778 दगावले... तुर्कीत गेल्या 24 तासांमध्ये 78 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा हा 3 हजार 336 वर पोहचला आहे. तर 1 हजार 983 जणांना कोरोची बाधा झाली असून देशातील कोरोनाबाधित रुग्णांच संख्या 1 लाख 24 हजार 375 ऐवढी झाली आहे. तसेच अमेरिकेत कोरोनामुळे सर्वांत जास्त दगावले आहेत. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या न्यूयॉर्कमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा आणि व्यवहार १५ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आणि मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या महामारीवर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक झपाटून काम करत आहेत. सप्टेंबरपर्यंत कोरोना विषाणूच्या विरोधातील लस बनविण्यात यश येईल, असा दावा ऑक्स्फर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. कोरोना विषाणूवरील लस बनविण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते. मात्र, त्याआधीच लस शोधून काढण्याचा दावा संशोधकांनी केला आहे.