वॉशिंग्टन डी. सी -कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 34 लाख 1 हजार 189 कोरोनाबाधित आढळेल आहेत.
Global Covid-19 Tracker : जगभरात 34 लाख 1 हजार 189 कोरोनाबाधित... - coronavirus deaths worldwide
अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 34 लाख 1 हजार 189 कोरोनाबाधित आढळेल आहेत.
तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 34 लाख 1 हजार 189 कोरोनाबाधित आढळले असून 2 लाख 39 हजार 604 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 10 लाख 81 हजार 639 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या न्यूयॉर्कमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा आणि व्यवहार १५ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
सध्या कोरोनाशी लढण्यासाठी जगातील सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. देशभरातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत असताना काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. एक महिन्यापासून देशामध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत.