वॉशिंग्टन डी. सी -कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 33 लाख 8 हजार 290 कोरोनाबाधित आढळेल आहेत.
तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 33 लाख 8 हजार 290 कोरोनाबाधित आढळले असून 2 लाख 34 हजार 108 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 10 लाख 42 हजार 841 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या न्यूयॉर्कमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा आणि व्यवहार १५ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
जगभरात 33 लाख 8 हजार 290 कोरोनाबाधित... अमेरिकेत कोरोनामुळे सर्वांत जास्त दगावले आहेत अमेरिकेत आत्तापर्यंत 10 लाख 95 हजार 210 कोरोनाबाधित असून 63 हजार 861 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 2 लाख 39 हजार 639 कोरोनाबाधीत तर 24 हजार 543 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यापाठोपाठ इटलीमध्ये 2 लाख 5 हजार 463 जण कोरोनाबाधित आहेत. तर 27 हजार 967 जणांचा बळी गेला आहे.
सध्या रशियामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. दररोज 7 हजार 99 नवीन कोरोनाबाधित रुग्णाची नोंद होत आहे. रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना महामारीवर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक झपाटून काम करत आहेत.