महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

GLOBAL COVID-19 TRACKER : जगातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८ लाखांवर, एका दिवसात साडे पाच हजार रुग्णांचा मृत्यू

जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत (५,६०,४३३) आढळून आले आहेत. तसेच, सर्वाधिक बळींची नोंदही अमेरिकेमध्येच (२२,११५) झाली आहे.

Global COVID-19 tracker
COVID-19 : जगातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८ लाखांवर, रुग्णांच्या वाढीत सातत्य..

By

Published : Apr 13, 2020, 11:05 AM IST

जगभरात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ७२,८४० रुग्ण आढळून आले. त्यामुळे जगभरातील एकूण रुग्णांची संख्या १८,५३,१५५ वर पोहोचली आहे. तसेच काल दिवसभरात ५,४१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जगातील एकूण बळींची संख्या १,१४,२४७वर पोहोचली आहे.

जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत (५,६०,४३३) आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ स्पेन (१,६६,८३१), इटली (१,५६,३६३), फ्रान्स (१,३२,५९१) आणि जर्मनीचा (१,२७,८५४) क्रमांक लागतो. तसेच, सर्वाधिक बळींची नोंदही अमेरिकेमध्येच (२२,११५) झाली आहे. त्यापाठोपाठ इटली (१९,८९९), स्पेन (१७,२०९), फ्रान्स (१४,३०९), आणि इंग्लंडचा (१०,६१२) क्रमांक लागतो.

कोरोना ग्लोबल ट्रॅकर..

दरम्यान, भारतातील रुग्णांची संख्या ९ हजारांपुढे गेली असून, आतापर्यंत ३०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू केलेले लॉकडाऊन वाढवण्याचा विचार केंद्रसरकार करत आहे.

हेही वाचा :इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयातून 'डिस्चार्ज'

ABOUT THE AUTHOR

...view details