जगभरात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ७१,७४८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जगभरातील रुग्णांची संख्या १२,७३,७१२ वर पोहोचली आहे. तसेच काल दिवसभरात ४,७३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बळींची संख्या ६९,४५८वर पोहोचली आहे.
जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत (३,३६,८३०) आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ स्पेन (१,३१,६४६), इटली (१,२८,९४८), जर्मनी (१,००,१२३) आणि फ्रान्सचा क्रमांक लागतो. तसेच, सर्वाधिक बळींची नोंद इटलीमध्ये (१५,८८७) झाली आहे. त्यापाठोपाठ स्पेन (१२,६४१), अमेरिका (९,६१८), फ्रान्स (८,०७८), आणि इंग्लंडचा (४,९३४) क्रमांक लागतो.