महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जगभरात कोरोनाचे साडेआठ लाखांहून अधिक रुग्ण; सुमारे ४२ हजारांचा मृत्यू.. - कोरोना रुग्ण संख्या

जगभरात कोरोनाचे ८,५९,०३१ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर, साधारणपणे ४२,३२२ लोकांचा यात मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १,७८,१०१ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

Global COVID-19 tracker
जगभरात कोरोनाचे साडेआठ लाखांहून अधिक रुग्ण; सुमारे ४२ हजारांचा मृत्यू..

By

Published : Apr 1, 2020, 12:30 PM IST

नवी दिल्ली - कित्येक देशांनी केलेल्या लॉकडाऊन नंतरही कोरोनाचा प्रसार जगभरात होतच आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनाचे ८,५९,०३१ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर, साधारणपणे ४२,३२२ लोकांचा यात मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १,७८,१०१ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

ग्लोबल कोरोना ट्रॅकर..

जगात अमेरिकेत सर्वाधिक (१,८८,५७८) रुग्ण आढळून आले आहेत. तर इटलीमध्ये सर्वाधिक (१२,४२८) लोकांचा बळी गेला आहे. बळींच्या संख्येत इटलीपाठोपाठ स्पेन (८,४६४), अमेरिका (४,०५४), फ्रान्स (३,५२३) आणि चीनचा (३,३०५) क्रमांक लागतो.

गेल्या २४ तासांमध्ये जगभरात सुमारे ७३ हजार नवे रुग्ण, तर साडे चार हजार नवे बळी गेल्याचे आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details