वॉशिंग्टन- नव्या वर्षात कोरोनाच्या मृत्यूने भयावह वाटावा असा आकडा ओलांडला आहे.कोरोना महामारीने जगभरात एकूण २० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने म्हटले आहे.
कोरोनाची आजतागायत जगभरातील ९ कोटी ३५ लाख १८ हजार १८२ जणांना लागण झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार कोरोनाने २० लाख २४६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील माध्यमाच्या माहितीनुसार कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून वर्ष पूर्ण होत असतानाच कोरोनाच्या मृतांचा हा भंयकर आकडा गाठला आहे.
हेही वाचा-कोरोना प्रसाराचं मूळ शोधण्यासाठी WHO ची टीम चीनमध्ये दाखल
- अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू आणि संसर्गाचे प्रमाण राहिले आहे. अमेरिकेत २, ३३, ९५,४१८ जणांना कोरोनाची लागण झाली. तर ३,९० हजार १९५ जणांचा मृत्यू झाला आहे.
- ब्राझीलमध्ये ८३,२४,२९४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २,०७,०९५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
- रशियात ३४,८३,५३१ जणांना तर युकेमध्ये ३३, २५,६३६ जणांना कोरोनाची लागण झाली.