न्यूयॉर्क -भविष्य हे जागतिकतावाद्यांच्या नव्हे तर देशभक्तांच्या हातात आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
भविष्य हे जागतिकतावाद्यांच्या नव्हे, तर देशभक्तांच्या हातात आहे : डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प म्हणाले, की स्वतंत्र जगाने आपल्या राष्ट्रीय मुलतत्त्वांना देखील स्विकारायला हवे. त्यांना मिटविण्याचा किंवा पुनर्स्थित करण्याचा प्रयत्न करू नये. सत्य हे स्पष्ट आहे. जर तुम्हाला स्वातंत्र्य हवे आहे, तर आपल्या देशाचा अभिमान बाळगा. तुम्हाला लोकशाही हवी असेल, तर आपल्या सार्वभौमत्त्वाला सोडू नका आणि जर तुम्हाला शांतता हवी असेल, तर आपल्या देशावर प्रेम बाळगा.
समजूतदार नेते हे नेहमीच आपल्या लोकांचे आणि आपल्या देशाचे भले करतात. भविष्य हे जागतिकतावादी लोकांच्या हातात नाही, तर त्यांच्या हातात आहे. जे आपल्या देशावर प्रेम करतात, जे आपल्या नागरिकांचे रक्षण करतात, अशा सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्रांच्या हातात आहे. जे आपल्या शेजारील देशांचा आदर करतात आणि प्रत्येक देशाला विशेष बनवणाऱ्या मतभेदांचा आदर करतात त्यांच्या हातात आहे. म्हणूनच अमेरिकेत राष्ट्रीय नूतनीकरणाचा एक रोमांचक कार्यक्रम सुरू केला गेला आहे. आमच्या नागरिकांची स्वप्ने आणि आकांक्षांच्या सबलीकरणावर आम्ही लक्ष केंद्रीत करतो आहोत, असेही ते म्हणाले.
युती आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात स्वतंत्र राष्ट्रांच्या आत्मनिर्णयाला प्राधान्य देण्याबाबत ट्रम्प आपल्या भाषणात बोलत आहेत.
हेही वाचा : काश्मीर मुद्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सभागृहातील प्रवास...