लास वेगास - अमेरिकेच्या नेवाडा राज्यात झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यांच्यापैकीच एक संभाव्य संशयित होता. एनबीसी न्यूजच्या वृत्तानुसार लास वेगासपासून 25 किलोमीटर अंतरावर हेंडरसन येथे मंगळवारी गोळीबार झाला.
हेही वाचा -'मतमोजणीत घोळ होणार'... निवडणुकीआधी ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य
शहर पोलीस अधिकारी कॅप्टन जेसन कुझिक यांनी पत्रकारांना बोलताना या प्रकरणातील पाचव्या जखमीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याच्या प्रकृतीविषयी माहिती कळू शकली नाही, असे सांगितले.
कुजिकच्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्यांना गोळ्या लागलेल्या दोन व्यक्ती आढळल्या. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर आपात्कालीन मदत मागवण्यात आली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
हेही वाचा -न्यूयॉर्कमधील विमानतळांवर मास्क न घातल्यास होणार 50 डॉलर्सचा दंड