वॉशिंग्टन डी. सी. - येणाऱ्या काळात लोक किती प्रमाणात अन्नग्रहण करू शकतात, याचा अभ्यास संशोधकांनी केला आहे. शरीराचे वजन आणि उंची यांच्या प्रमाणानुसार लोकांची कॅलरीज् (उर्जा) घेण्याची क्षमता ठरते. 'प्लोस वन' या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
बहुतांशी देशांमध्ये उंची आणि वजन यांच्या सरासरीमध्ये बदल होऊन वाढ झाली आहे. अर्थशास्त्राचे प्राध्यापक स्टीफन क्लासेन आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने 2010 ते 2100 या कालावधीत जगाच्या लोकसंख्येला किती अन्नाची गरज असेल, याचा आराखडा मांडला आहे. या अभ्यासासाठी नेदरलँड आणि मेक्सिकोमध्ये अन्नग्रहण करण्याच्या प्रमाणात झालेल्या बदलांचा वापर करण्यात आला. 2100 पर्यंत लोकांच्या अन्नग्रहण करण्याच्या क्षमतेमध्ये 60 टक्क्यांनी वाढ होईल, असे क्लासेन यांचे म्हणणे आहे.