वॉशिंग्टन -अमेरिकेच्या ईशान्य भागात हिवाळ्यातील जोरदार वादळामुळे 5 जणांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क राज्यात वादळाशी संबंधित दोन मृत्यूची नोंद झाली आहे, असे सिन्हुआ न्यूज एजन्सीने गुरुवारी राज्यपाल अँड्र्यू कुमो यांचा हवाला देताना सांगितले.
बुधवारी क्लिंटन काउंटी पेनसिल्व्हेनिया येथून धक्कादायक छायाचित्र समोर आले होते. तेथे आंतरराज्यीय महामार्ग 80 वर 11 प्रवासी वाहनांसह 66 वाहने एकमेकांना धडकली. राज्य पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या गाड्या हटविण्याचे काम सुरू असल्याने गुरुवारी आंतरराज्य महामार्ग बंद राहिला.