महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ब्राझीलमध्ये रुग्णालयात भीषण आग; रुग्णांसह ११ जणांचा मृत्यू - brazil latest news

ब्राझीलमध्ये रुग्णालयात भीषण आग लागल्यामुळे रुग्णांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यात अग्निशामक दलाचे ४ जवानही जखमी झाले आहेत.

ब्राझीलमध्ये रुग्णालयात भीषण आग

By

Published : Sep 14, 2019, 10:50 AM IST

रिओ द जानरिओ- ब्राझीलमध्ये रुग्णालयात भीषण आग लागल्यामुळे रुग्णांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रिओ द जानरिओमधील एका रुग्णालयात आग लागली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. यात ४ जवानही जखमी झाले आहेत.

आगीमुळे रुग्णालयातील इतर ९० रुग्णांना आणि जखमी जवानांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत बेडशीटच्या साहाय्याने दोरी बनवून वरच्या मजल्यावर अडकलेल्या रुग्णांना खाली उतरवले. रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये प्रचंड धूर जमा झाला होता. त्यामुळे धुरात गुदमरून काहींचा मृत्यू झाला, तर कृत्रिम श्वास यंत्रे आग लागल्यावर बंद पडल्याने काहींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details