चेन्नई (तामिळनाडू) -अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. बायडेन राष्ट्राध्यक्षपदी तर भारतीय-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस उपाध्यक्षपदी विराजमान होतील. कमला हॅरिस यांच्या विजयाबद्दल त्यांच्या मामी डॉ. सरला गोपालन यांनी आनंद व्यक्त केला. आता कमला हॅरिस'च्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याची आशा असल्याचे डॉ. गोपालन म्हणाल्या.
डॉ. गोपालन म्हणाल्या, शनिवारी हॅरिसशी बोलता आले नाही. कारण तिने संपूर्ण दिवस आपल्या विजयाच्या घोषणेत घालविला. डॉ गोपालन एका स्वयंसेवी आरोग्य सेवेत वरिष्ठ सल्लागार आहेत. त्या म्हणाल्या, मी रात्री उशिरापर्यंत हॅरिस यांच्या विजयाच्या घोषणेची प्रतीक्षा करत होते.
पहिल्या कृष्णवर्णीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष -
कमला हॅरीस या उपाध्यक्षपदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय वंशाच्या महिला ठरणार आहेत. कमला हॅरिस या भारतीय-आफ्रिकन वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलँडमध्ये झाला. कमला यांच्या आई श्यामला गोपालन या मूळच्या तामिळनाडूतील होत्या. मात्र, शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर त्या तिकडेच स्थायिक झाल्या होत्या.
कमला हॅरिस यांनी मतदारांचे मानले आभार-