वॉशिंग्टन - अमेरिकेच्या व्हिस्कॉन्सिन राज्यातील एका मॉलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 8 जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. सध्या हा बंदूकधारी फरार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी मिल्वॉकी महानगर परिसरातील वॉवेटोसा शहरातील मॉलमध्ये घडली.
हेही वाचा -'बिडेन, हॅरिसची टीम चांगली', बिल गेट्स यांचा ट्रम्प यांच्यावर निशाणा
वॉवेटोसाचे महापौर डेनिस मॅकब्राइड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जखमींपैकी कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही आणि हल्लेखोर फरार आहे.
मॅकब्राइड म्हणाले की, गोळीबार दुपारी तीनच्या सुमारास झाला. या प्रकरणी मॉलमध्ये 75 पोलिस अधिकारी तपास करत आहेत.
'अधिक अचूक माहिती प्रदान करण्यास वेळ लागेल. परंतु, ती मिळताच ती उपलब्ध करुन देण्यात येईल,' असे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा -2021चा उन्हाळा जवळजवळ सामान्य असेल : बिल गेट्स