महाराष्ट्र

maharashtra

जागतिक मंदीचा फटका भारतालाही बसणार - आयएमएफ प्रमुख

By

Published : Oct 9, 2019, 11:12 PM IST

भारतासारख्या देशांच्या बाजारपेठांवरही यंदा मंदीचे परिणाम ठळकपणे दिसून येतील, असे आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी म्हटले आहे.

क्रिस्टलीना जॉर्जिवा

वॉशिंग्टन -जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. मात्र, अद्याप भारतासारख्या उदयोन्मुख देशांना त्याचा फारसा फटका बसलेला नाही. मात्र, मोठ्या कालावधीसाठी ही मंदी राहिल्याने येथील बाजारपेठेलाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केली आहे.

भारतासारख्या देशांच्या बाजारपेठांवरही यंदा मंदीचे परिणाम ठळकपणे दिसून येतील, असे आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी म्हटले आहे. त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर गेल्या दहा वर्षामधील निचांकी पातळीला पोहोचण्याची भीती व्यक्त केली आहे. ९० टक्के जगाला या मंदीचा सामना करावा लागेल असे भाकीत क्रिस्टलीना यांनी वर्तवले आहे. जीडीपीचा विचार केल्यास ७५ टक्के जगाचा प्रवास विकासाच्या दिशेने सुरु होता. त्या वेळी म्हणजेच दोन वर्षांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्था प्रगतीपथावर होती, असे त्यांनी म्हटले आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांचे हे पहिले भाषण होते. त्यांनी याच महिन्यात आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारला.

अमेरिका आणि जर्मनीमध्ये मोठया प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. अमेरिका, जापान आणि युरोपमधल्या विकसित देशांमध्ये आर्थिक घडामोडींचा वेग मंदावला आहे. भारत, ब्राझील सारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये मंदीचे परिणाम ठळकपणे दिसून येतील असे क्रिस्टलीना म्हणाल्या. सध्या हे परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसत आहेत, असे त्या म्हणाल्या.

सध्या भारतात वाहन उद्योगासह अन्य क्षेत्रांना मंदीचा सामना करावा लागतोय. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळी पावले उचलण्यात येत आहेत. पण त्याचा अपेक्षित परिणाम अजून दिसलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details