महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Earthquake in Peru : शक्तीशाली भूकंपाने पेरू हादरले! - पॅसिफिक रिंग ऑफ फायर

दक्षिण अमेरिकेतील पेरू रविवारी शक्तिशाली भूकंपाच्या(Earthquake in Peru) धक्क्याने हादरले. पेरूमधील बरान्कांच्या(Barranca) उत्तरेत भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार, सुदैवाने या भूकंपात कसल्याही जीवितहानीचे वृत्त नाही.

Earthquake in Peru
Earthquake in Peru

By

Published : Nov 28, 2021, 5:11 PM IST

लिमा : दक्षिण अमेरिकेतील पेरू रविवारी शक्तिशाली भूकंपाच्या(Earthquake in Peru) धक्क्याने हादरले. पेरूमधील बरान्कांच्या(Barranca) उत्तरेत भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार, सुदैवाने या भूकंपात कसल्याही जीवितहानीचे वृत्त नाही.

बरान्काच्या उत्तरेला 36 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा धक्का बसल्याचे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.4 इतकी नोंदविण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार सुदैवाने या भूकंपात कसल्याही जीवितहानीचे वृत्त नाही. मात्र भूकंपाची तीव्रता बघता नुकसानीची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पेरू हे जागतिक भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर वसलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details