महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

डोनाल्ड ट्रम्प यांचे अप्रत्यक्षपणे ईराणला चर्चेसाठी निमंत्रण, केले 'हे' टि्वट - Qassem Soleimani

अमेरिकेने शुक्रवारी हवाई स्ट्राईक करत इराणच्या विशेष कुद फोर्सचा नेता आणि प्रमुख कासीम सुलेमानी याचा खात्मा केला.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Jan 3, 2020, 11:30 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेने शुक्रवारी हवाई स्ट्राईक करत इराणच्या विशेष कुद फोर्सचा नेता आणि प्रमुख कासीम सुलेमानी याचा खात्मा केला. त्यानंतर सुलेमानी यांच्या हत्येचा भयंकर सूड घेऊ, अशी प्रतिज्ञा इराणने केली आहे. त्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करून अप्रत्यक्षपणे ईराणला चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.

‘इराण हा युद्धात कधीच जिंकत नाही, मात्र तो तहात हरतही नाही’ या आशयाचे टि्वट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. सूड घेण्याची भाषा करणाऱ्या इराणला ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे चर्चेचे निमंत्रण दिले आहे.अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा हवाई हल्ला घडवून आणला. यामध्ये अमेरिकेने दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या कासीम सुलेमानी याला ठार करण्यात आले. त्याच्यासह आणखी ६ जण ठार झाले. या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराणदरम्यानच्या तणावात भर पडली आहे.इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी सुलेमानी हे हुतात्मा झाले आहेत,' असे खामेनी यांनी म्हटले आहे. सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहतानाच त्यांच्या हत्येसाठी अमेरिकेचा भयंकर सूड उगवण्यात येईल, अशी शपथ घेत त्यांनी अत्यंत जहाल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर केला आहे, असे वृत्त अल जझीराने दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details