न्यूयॉर्क- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. डोनाल्ड ट्रम्प यांना वॉशिंग्टनमधील मुख्य सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते आता या दवाखान्यात राहून त्यांचे कामकाज करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बायोटेक कंपनी, रेजेनरॉनद्वारे उत्पादित केलेले औषध सध्या ट्रम्प घेत आहेत, असे त्यांचे डॉक्टर शॉन कॉनले यांनी शुक्रवारी सांगितले होते. व्हाईट हाऊसमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये अनौपचारिकरित्या बोलताना ट्रम्प म्हणाले, "मी वॉल्टर रीड हॉस्पिटलमध्ये जात आहे. मला चांगले वाटत आहे, परंतु आम्ही खात्री करून घेत आहोत की, सर्व गोष्टी योग्य आहेत. प्रथम लेडी मेलानियाही ठीक आहेत.