महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'अमेरिकेच्या नागरिकांना पुढील वर्षात एप्रिलपर्यंत कोरोनाची लस मिळेल'

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरूनही डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या लसीविषयी आश्वासन दिले आहे. कोरोनाची लस ही पहिल्यांदा कोरोनाच्या लढ्यात असलेल्या वयस्कर व्यक्तींना आणि अतिधोका असलेल्या नागरिकांना देण्यात येणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Nov 14, 2020, 12:32 PM IST

वॉशिंग्टन- अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर कार्यक्रमात भाषण केले. येत्या वर्षात एप्रिलपर्यंत अमेरिकन नागरिकांना कोरोनावरील लस मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. ते व्हाईट हाऊसमधील 'रोझ गार्डन'मध्ये बोलत होते.

औषध कंपनी फायझरने कोरोनावरील लस ही परिणामकारक असल्याचा दावा केला आहे. त्याबाबत बोलताना डोलान्ड ट्रम्प म्हणाले, की नागरिकांना पुढील २०२१ मध्ये एप्रिलपर्यंत कोरोनाची लस मिळेल. कोरोनाची लस ही पहिल्यांदा कोरोनाच्या लढ्यात असलेल्या वयस्कर व्यक्तींना आणि अतिधोका असलेल्या नागरिकांना देण्यात येणार आहे.

निवडणुकीत पराभूत होवूनही डोनाल्ड ट्रम्प हट्टी-

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराजय स्वीकारला नाही. ट्रम्प यांनी ५ नोव्हेंबरला जाहीर कार्यक्रमात भाषण केले होते. वैध मतांची मोजणी केली तर सहज जिंकू असा त्यांनी त्यावेळी दावा केला होता. पुढे ते म्हणाले होते, की काही महत्त्वाच्या राज्यात जिंकलो आहे. यामध्ये फ्लोरिडा, इओवा, इंडियाना, ओहियो यांचा समावेश आहे. शक्तीशाली माध्यम, पैसे आणि तांत्रिक हस्तक्षेप करूनही ऐतिहासिकदृष्ट्या विजय मिळाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला होता.

जो बायडेन यांचा मोठा विजय-

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचे निवडणुकीतील स्पर्धक जो बायडने यांना एरिजोना आणि जॉर्जिया राज्यांमध्ये विजय मिळविला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला ३६० जागांवर विजय मिळाला आहे. तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना २३२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यांना नॉर्थ कॅरोलिना येथील जागेवर विजय मिळाला आहे.

चीननेही बायडेन यांनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा-

चीननेही जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिका निवडणूक आणि आंतराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रियांवर आमची नजर असल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता वांग वेनबिन यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details