महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिकेत टिकटॉकची ओरॅकल, वॉलमार्टशी भागीदारी; 25 हजार अमेरिकन लोकांना नोकऱ्या - अमेरिकेत टिकटॉकची ओरॅकल, वॉलमार्टशी भागीदारी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी लोकप्रिय व्हिडिओ-शेअरिंग अ‌ॅप टिकटॉक ओरॅकल आणि वॉलमार्टबरोबर भागीदारी करेल आणि आणि अमेरिकन कंपनी बनेल, असे म्हटले आहे. या कंपनीत ओरॅकलचा हिस्सा 12.5 टक्के तर, वॉलमार्टचा हिस्सा 7.5 टक्के असणार आहे. ही कंपनी पुढील वर्षी तयार होईल, असे या कंपन्यांनी स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे. टेक्सासमध्ये नवीन कंपनी तयार होईल, असे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले. ही कंपनी अमेरिकन लोकांना शिक्षणासाठी 5 अब्ज डॉलर्सची देणगीही देणार आहे.

टिकटॉक
टिकटॉक

By

Published : Sep 20, 2020, 6:56 PM IST

न्यूयॉर्क - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी लोकप्रिय व्हिडिओ-शेअरिंग अ‌ॅप टिकटॉक ओरॅकल आणि वॉलमार्टबरोबर भागीदारी करेल आणि आणि अमेरिकन कंपनी बनेल, असे म्हटले आहे. या प्रस्तावित कराराला आपण मंजुरी दिल्याचे ते म्हणाले. तसेच, या नव्या कंपनीत किमान 25 हजार अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळतील, असे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय, ही कंपनी अमेरिकन लोकांना शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या निधीसाठी 5 अब्ज डॉलर्सची देणगी देणार असल्याचेही ते म्हणाले.

वॉशिंग्टन आणि बीजिंग दरम्यान वाढत्या तणावादरम्यान ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि अमेरिकन लोकांच्या माहितीच्या गोपनीयतेसंबंधी चिंता व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी चीनच्या मालकीच्या टिकटॉकला वारंवार लक्ष्य केले होते. ही कंपनी अमेरिकन लोकांची माहिती चिनी सरकारला देत असल्याचा आरोपही अमेरिकन प्रशासनाने केला होता. मात्र, आता टिकटॉकसोबत दोन अमेरिकन कंपन्या करार करणार असून ही कंपनी पूर्णपणे अमेरिकन असेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच, या कंपनीचा चीनशी काही संबंध नसेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने टिकटॉकवर निर्बंध घातल्याची घोषणा केल्याच्या एका दिवसानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. हे निर्बंध लागू झाले असते तर, अमेरिकेतील टिक-टॉकच्या चाहत्यांना हे अ‌ॅप वापरणे अशक्य झाले असते.

या कंपनीत ओरॅकल आणि वॉलमार्ट सुमारे 20 टक्के भाग मिळवू शकतात. यात ओरॅकलचा हिस्सा 12.5 टक्क्यांचा तर, वॉलमार्टचा हिस्सा 7.5 टक्के असणार आहे. ही कंपनी पुढील वर्षी तयार होईल, असे या कंपन्यांनी स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे. हा करार पूर्ण झाल्यास टेक्सासमध्ये नवीन कंपनी तयार होईल, असे ट्रम्प म्हणाले.

'टिकटॉक, ओरॅकल आणि वॉलमार्ट या तीन कंपन्या मिळून अमेरिकन प्रशासनाला राष्ट्रीय सुरक्षिततेविषयी वाटणारी चिंता दूर करतील. तसेच, टिकटॉकच्या अमेरिकेतील भविष्याचा मार्गही सुरळित होईल, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे,' असे टिकटॉकने म्हटले आहे.

ट्रम्प यांनी सातत्याने टिक टॉकने त्यांचा अमेरिकेतील भाग अमेरिकन कंपन्यांना विकावा किंवा तो बंद करावा, अशी मागणीही केली होती. अशाच प्रकारे त्यांनी चिनी मालकीच्या वुई-चॅटलाही लक्ष्य केले होते.

प्रशासनाने असा दावा केला आहे की, या दोन अ‌ॅप्सद्वारे गोळा केलेली वापरकर्त्यांची माहिती चिनी सरकारबरोबर सामायिक केली जाऊ शकते. मात्र, शनिवारी ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेतील टिकटॉकचे आता 'चीनशी काही देणेघेणे नाही.' टिकटॉकच्या म्हणण्यानुसार त्यांचे अमेरिकेत 100 दशलक्ष वापरकर्ते आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details