अटलांटा – जगभरात थैमान माजविणारा कोरोनाची पाळीव प्राण्यांनाही लागण होत आहे. जॉर्जिया राज्यातील कुत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत कुत्र्याला कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी घटना असल्याचे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
धक्कादायक! अमेरिकेतील जॉर्जियामध्ये कुत्र्याला कोरोनाची लागण - Corona positive cases in pets
कोरोनाची लागण झालेल्या कुत्र्याच्या मालकाला यापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मालकाच्या संपर्कात आल्यानंतर कुत्र्यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती जॉर्जियाच्या आरोग्य विभागाने माहिती जाहीर केली आहे.
कोरोनाची लागण झालेल्या कुत्र्याच्या मालकाला यापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मालकाच्या संपर्कात आल्यानंतर कुत्र्यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती जॉर्जियाच्या आरोग्य विभागाने माहिती जाहीर केली आहे. सुरुवातीला कुत्र्याला मज्जातंतुचा आजार झाला होता.
या पाळीव प्राण्याची सार्स कोविड 2 चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. याच विषाणुमुळे कोरोनाची लागण होते. या प्राण्याला मज्जातंतुचा आजार होण्याशी कोरोनाचा संबंध नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या आजार नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने पाळीव प्राण्यांतील कोरोनाबाबत मर्यादित माहिती असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पाळीव प्राण्यांपासून माणसाला कोरोनाची चाचणी होत नसल्याचे यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेसह संशोधकांनी म्हटले आहे.