वॉशिंग्टन डी. सी - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. जगप्रसिद्ध डिस्ने कॅलिफोर्निया अॅडव्हेंचर पार्क कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. दरम्यान पुढच्या महिन्यात अॅडव्हेंचर पार्क सुरू करण्याची योजना होती. मात्र, परिस्थिती पाहता पुढील सूचना येईपर्यंत पार्क बंद राहणार आहे.
डिस्ने कॅलिफोर्निया अॅडव्हेंचर पार्क कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी बंद - डिस्ने कॅलिफोर्निया अॅडव्हेंचर पार्क
जगप्रसिद्ध डिस्ने कॅलिफोर्निया अॅडव्हेंचर पार्क कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. दरम्यान पुढच्या महिन्यात अॅडव्हेंचर पार्क सुरू करण्याची योजना होती. मात्र, परिस्थिती पाहता, पुढील सूचना येईपर्यंत पार्क बंद राहणार आहे.
थीम पार्क आणि रिसॉर्ट हॉटेल पुन्हा सुरू करण्यासाठी अधिकाऱ्याची मान्यतेची वाट पाहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असे निवदेनात म्हटले आहे. मार्गदर्शक तत्त्वे कधी जाहीर होणार यासंबधित माहिती मिळाल्यास आम्ही पार्क पुन्हा उघड्याच्या तारीख ठरवू, असेही निवेदनात म्हटले आहे. तथापि, डिस्नेलँड रिसॉर्टचा एक भाग असलेले डाउनटाऊन डिस्ने शॉपिंग आणि डिस्ने लँड रिसॉर्ट 9 जुलैला सुरू होणार आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कार्य करणे जोखीम पूर्ण काम आहे, असे पार्क कर्मचारी प्रतिनिधित्व करणारे संघटनेने म्हटलं आहे. साथीच्या आजारामुळे डिस्नेलँड आणि वॉल्ट डिस्ने वर्ल्ड मार्चपासून बंद आहे. दरम्यान फ्लोरिडा थीम पार्क आणि रिसॉर्ट पुढील महिन्यात पुन्हा सुरू होणार आहे. यास राज्य आणि स्थानिक प्रशासनाने मंजुरी दिली आहे.