वॉशिंग्टन - अमेरिकेचे आरोग्य आणि मानवी सेवा मंत्री अॅलेक्स अझर (एचएचएस) यांनी कोविड - 19 ची लस पुढील वर्षाच्या (2021) एप्रिलपर्यंत सर्व अमेरिकन नागरिकांना उपलब्ध करुन दिली जाऊ शकते, असे म्हटले आहे.
सीबीएस न्यूजला अझर यांनी दिलेल्या मुलाखतीचा हवाला देताना सिन्हुआ वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. 'जानेवारी अखेरीस आमच्या वरिष्ठ, आरोग्यसेवा कामगार आणि प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात लसी तयार होतील. मार्च आणि एप्रिलच्या अखेरीस सर्व अमेरिकन लोकांना पुरेशी लस उपलब्ध होईल,' असे अझर यांनी म्हटले.
हेही वाचा -अमेरिकेची कोविड -19वरील उपचारांसाठी अँटिव्हायरल रेमडेसिव्हिर औषधास पूर्ण मंजूरी