जिनिव्हा -कोरोनाच्या लसीचे उत्पादन लवकरच होण्याची शक्यता असताना जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त होणार मत व्यक्त केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी जगभरात सुरू असलेली महामारी दोन वर्षात संपेल, असे सांगितले. ते ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यां नी महामारीत राष्ट्रीय एकता व जागतिक दृढ ऐक्य ठेवण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित केले.
जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस म्हणाले, की 1918 मध्ये आलेला स्पॅनिश फ्ल्यू संपण्यासाठी दोन वर्षे लागली होती. मात्र, सध्याच्या तंत्रज्ञानाने महामारीवर मात करण्यासाठी त्या मानाने कमी वेळ लागू शकतो. जास्त संपर्कामुळे विषाणू पसरण्याची शक्यता अधिक असते. त्याचवेळी आपल्याकडे संसर्ग थांबविण्यासाठी तंत्रज्ञान आणि ज्ञान आहे.