महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Global Covid-19 Tracker : जगभरामध्ये 1 लाख 84 हजार दगावले - जगभरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण

जगभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजार 888 वर पोहोचली आहे. तर 1 लाख 84 हजार 235 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 7 लाख 17 हजार 819 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. अमेरिकेत कोरोना संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.

global-covid-19-tracker
global-covid-19-tracker

By

Published : Apr 23, 2020, 11:33 AM IST

Updated : Apr 23, 2020, 11:46 AM IST

वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 लाख 84 हजार 235 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरामध्ये 1 लाख 84 हजार दगावले

जगभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजार 888 वर पोहोचली आहे. तर 1 लाख 84 हजार 235 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 7 लाख 17 हजार 819 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.अमेरिकेत कोरोना संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. देशभरात रुग्णांचा आकडा साडेआठ लाखांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे न्यूयॉर्क शहरात 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे

अमेरिकेत आत्तापर्यंत 8 लाख 49 हजार 92 कोरोनाबाधित असून 47 हजार 681 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 2 लाख 8 हजार 389 कोरोनाबाधीत तर 21 हजार 717 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यापाठोपाठ इटलीमध्ये 1 लाख 87 हजार 327 जण कोरोनाबाधित आहेत. तर 25 हजार 85 जणांचा बळी गेला आहे.

जगभरात 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आणि मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या महामारीवर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक झपाटून काम करत आहेत.

हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या उपायासाठी परिणामकारक सिद्ध ठरत आहे. अनेक रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. मलेरियासाठी वापरले जाणारे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या रुग्णांसाठीही गुणकारी असल्याचे काही चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे. ब्राझील, कुवैत, अफगाणिस्तान, मालदिव, अमेरिका या देशांना भारताने मदत केली आहे.

Last Updated : Apr 23, 2020, 11:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details