वॉशिंग्टन डी. सी - देशभरामध्ये प्रसार झालेला कोरोना आता थेट अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचला आहे. उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उपराष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या सचिव केट मिलर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
कोरोना व्हाईट हाऊसमध्ये दाखल, उपराष्ट्राध्यक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्याला बाधा
अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत १९ हजार ६५८ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आत्तापर्यंत २६४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचा या कर्मचाऱ्यांशी जवळून संबध आला नाही. या कर्मचाऱ्याशी संबध आलेल्या व्यक्तींना शोधण्यात येत असून त्यानुसार योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. शुक्रवारी सायंकाळी चाचणी सकारात्मक आल्याची माहिती मिलर यांनी दिली.
अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत १९ हजार ६५८ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आत्तापर्यंत २६४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काल (शुक्रवारी) दिवसभरात ४९ जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंधने घातली आहेत. तर युरोपमधून अमेरिकेत येण्यास बंदी केली आहे. कोरोनाचा बिमोड करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धकालीन उत्पादन कायदा लागू केला आहे. त्यानुसार मास्क, औषधे आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येणार आहे.