महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 25, 2020, 6:24 PM IST

ETV Bharat / international

कोरोनामुळे जगभरात मृतांचा आकडा 2 लाखांच्या जवळ; 28 लाखांपेक्षा जास्त बाधित

अमेरिकेत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 9 लाख 25 हजार 758 कोरोना बाधीत एकट्या अमेरिकेत आढळले आहेत.

file pic
संग्रहित छायाचित्र

वॉशिंग्टन डी. सी- जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने मृतांचा आकडा 2 लाखांच्या जवळ आला आहे. आत्तापर्यंत 1 लाख 97 हजार 997 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 लाख 47 हजार 507 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 8 लाख 12 हजार 45 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

अमेरिकेत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 9 लाख 25 हजार 758 कोरोनाबाधित एकट्या अमेरिकेत आढळले आहेत. तर 52 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल फ्रान्स, इटली, स्पेनमध्ये 20 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. जागतिक व्यापार, उद्योग, पर्यटन, वाहतूक सर्व खोळंबली असून जगावर आरोग्य आणीबाणी आली आहे. अनेक देशांना वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासत आहे, त्यातच रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details