वॉशिंग्टन डीसी - पाकिस्तानला दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार धरण्यापासून चीनने मुत्सद्दीपणे संरक्षण करावे, असे इस्लामाबादला वाटते. तर, भारतविरोधी कारवाया करण्यासाठी दहशतवादाचा वापर साधन म्हणून करावा, अशी बीजिंगची इच्छा आहे, असे सार्वजनिक धोरण संशोधक मायकेल रुबिन यांनी म्हटले आहे.
वॉशिंग्टन येथील परीक्षक रुबिन एका अभिप्रायात म्हणाले की, 'दहशतवादविरोधी कार्यवाही करण्यासाठी किंवा तो रोखण्यासाठी बीजिंग फारसा उत्सुक नाही. उलट, लडाखमधील सीमेवरील संघर्षात अडकलेल्या भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादाचा उपयोग करण्याची चीनची इच्छा असल्याचे दिसत आहे.'
'दोन महाशक्तींदरम्यानच्या स्पर्धेचे आणि दुसर्या महायुद्धानंतरच्या उदारमतवादी व्यवस्थेला कमी करणे हे चीनच्या प्रयत्नांचे वास्तव आहे. चीनकडून बर्याच आघाड्यांवर असे होताना दिसत आहे. एफएटीएफ हेही त्यापैकी एक आहे असे दिसते. भरीव सुधारणा करण्याऐवजी, पाकिस्तानी अधिकारी चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा त्यांच्या जबाबदारीपासून मुत्सद्दीपणाने बचाव करेल, असा विचार करतात,' असेही ते म्हणाले.
एफएटीएफच्या प्लेनरी बैठकीच्या समाप्तीपूर्वी हे विधान पुढे आले आहे. या बैठकीत पाकिस्तान दहशतवादविरोधी कृती आराखड्याचे पालन न केल्याबद्दल पाक ग्रे लिस्टमध्ये राहील किंवा पाकला काळ्या यादीत टाकले जाईल, याचा निर्णय होणे अपेक्षित आहे.
हेही वाचा -पाकिस्तान एफएटीएफच्या 'ग्रे लिस्ट'मधून बाहेर पडण्याची शक्यता नाहीच : अहवाल