वॉशिंग्टन डी. सी. - चीनच्या अत्यंत आक्रमक कारवायांना भारतीयांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. प्रादेशिक वाद चिथावण्याकडे चीनचा कल असून जगाने ही गुंडगिरी चालू देऊ नये, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ म्हणाले. 'परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी मी चीनच्या आक्रमक कारवायांबद्दल चर्चा केली, असल्याचेही त्यांनी सांगितले.
चीनच्या 'आक्रमक कारवाई'ला भारताने चोख प्रत्युत्तर दिले - अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ
चीनच्या अत्यंत आक्रमक कारवायांना भारतीयांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. प्रादेशिक वाद चिथावण्याकडे चीनचा कल असून जगाने ही गुंडगिरी चालू देऊ नये, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ म्हणाले.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आक्रमक वृत्तीकडे स्वतंत्रपणे पाहणे शक्य होईल, असे मला वाटत नाही. आपण त्याला एका व्यापक संदर्भातून पहायला हवे. यापूर्वी भूतानच्या अभयारण्यावरही ग्लोबल एन्व्हॉयरमेंटर फॅसिलिटच्या बैठकीत चीननं आपला दावा केला होता. चीनच्या चिथावणीखोर वृतीविरोधात जगाला एकत्र येण्याची गरज आहे, असे पॉम्पिओ ठामपणे म्हणाले.
आशिया खंडातील चीनची वाढती दादागिरी पाहून अमेरिकेनंही आता कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वीही भारत आणि आग्नेय आशियासाठी चीन धोका बनला असल्याचं मत, पॉम्पिओ यांनी व्यक्त केलं होतं.