महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'कोरोना संकटाचा फायदा घेत चीनचं अमिरिकेविरोधात आर्थिक युद्ध' - economic warfare

जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. कोरोना संकटाचं मूळ असलेल्या चीनमध्ये मात्र आता कोरोना आला आहे. याचा फायदा आर्थिक स्तरावर अमेरिकेला मागे टाकण्यासाठी चीन घेत आहे. अमेरिकेच्या संरक्षण खात्याने (पेंटॅगॉन) हे निरिक्षण नोंदवले आहे.

चीन-अमेरिका
चीन-अमेरिका

By

Published : Jun 18, 2020, 2:52 PM IST

Updated : Jun 18, 2020, 4:32 PM IST

वॉशिग्ंटन -जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. वाढत्या संक्रमणासोबतच जगातिक अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. कोरोना संकटाचं मूळ असलेल्या चीनमध्ये मात्र आता कोरोना आटोक्यात आला आहे. याचा फायदा आर्थिक स्तरावर अमेरिकेला मागे टाकण्यासाठी चीन घेत आहे. अमेरिकेच्या संरक्षण खात्याने (पेंटॅगॉन) हे निरिक्षण नोंदवले आहे.

कोरोनामुळे राष्ट्रीय सुरक्षा विषयाची व्याख्या बदलत आहे. यावर पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी अमेरिकेतील छोट्या व्यवसायांना पेंटॅगॉन मदत करत आहे. अमेरिकेच्या धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कंपन्यांमध्ये असलेल्या भागिदारीतून मालकी मिळवण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे. कारण, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अनेक कंपन्यांना भांडवलाची गरज भासू लागली आहे, अमेरिकेच्या संरक्षण खात्याने (पेंटॅगॉन) हे निरिक्षण नोंदवले आहे.

कोरोनामुळे संरक्षण विभागाला राष्ट्रीय सुरक्षेवर लक्ष ठेवणे आणि लहान कंपन्यांचे संरक्षण करणे कठीण होत आहे. पूर्वीपेक्षा संरक्षण कंपन्यांना भांडवलाची आवश्यकता जास्त आहे. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी चीन करत असलेल्या प्रत्येक संकेतकांकडे आम्ही बारीक लक्ष देत आहोत, असे एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले.

संपादन आणि टिकाव संरक्षण सचिव अलेन लॉर्ड म्हणाले की, आमचे विरोधकांच्या हालचालींवर बारीक लक्ष आहे. तसेच आपण आपल्या विरोधकांच्या प्रयत्नांबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. अमेरिकन परदेशी गुंतवणूक समिती धोरणात्मक महत्त्वपूर्ण कंपन्यांमध्ये मालकी मिळविणाऱ्या विरोधी देशांपासून संरक्षण करत आहे.

कोरोना विषाणूची सुरुवात मध्य चीनमधील वुहान प्रांतातून झाली होती. त्यानंतर हा विषाणू झपाट्यानं जगभरात पसरत होता. चीनमध्ये हा विषाणू आटोक्यात आला. मात्र, जगभरात त्यानं थैमान घातलं आहे.

Last Updated : Jun 18, 2020, 4:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details